Peth Vadgaon Ganpati Temple Accident
esakal
पेठवडगाव : येथील गणपती मंदिरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणी जागीच ठार झाली. दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना टेम्पोचे पाठीमागील चाक डोक्यावरून गेले. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात (Kolhapur Road Accident) झाला. महेक दीपक चावला (वय २३, रा. गांधीनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे.