हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे दर्शन; करबल नृत्य 

Philosophy of Hindu-Muslim unity; Karbala dance
Philosophy of Hindu-Muslim unity; Karbala dance
Updated on

कोल्हापूर  : करबल खेळ नृत्याद्वारे सादर केला जाणारा एक लोककला प्रकार. कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी, कवठेसार, टाकवडे, कुंभोज, रेंदाळ, बोरगाव, गडहिंग्लज व कर्नाटकातील काही गावांत तो आजही सादर केला जातो. हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक असलेल्या मोहरम सणादरम्यान त्याचे सादरीकरण होते. ढोल, ताशा, सनई या वाद्यांसह सोळा ध्वजधारक करबलात सहभागी होतात. 

महंमद पैगंबर यांचे नातू हसन व हुसेन करबलाच्या रणभूमीत सत्यासाठी लढत होते. त्यात त्यांनी अतुलनीय शौर्य गाजविले. मात्र, लढाईत ते शहीद झाले. यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोहरम सण ठीक ठिकाणी साजरा होतो. शौर्य, वीर व करुणरसयुक्त गाण्यांचा कार्यक्रम या सणाच्या निमित्ताने सादर होतो. "करबल दंगल' या कार्यक्रमाद्वारे करबल गीते गाण्याची परंपरा आजही टिकून आहे. 

या कलाप्रकारात वस्तादांनी रचलेल्या रिवायती (आठवणी) कलाकार वस्तादांचे नाव प्रामुख्याने घेऊन गातात. शाहिरीप्रमाणे गीतांचे सादरीकरण केले जाते. रंगीबेरंगी पोशाखात तरुण करबल नृत्य सादर करून हसन व हुसेन यांच्या शौर्याच्या आठवणींना उजाळा देतात. कन्नड, मराठी, हिंदी गाण्यांवर आधारित याची गाणी गायली जातात. मोहरम दुःखाचा सण असून, विविध ठिकाणी पंजांची प्रतिष्ठापना केली जाते. पंजांच्या भेटीचा सोहळाही होतो. हिंदू-मुस्लिम समाजातील लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात. अलीकडच्या काळात मात्र ताबूत विसर्जनादिवशी पारंपरिक वाद्यांऐवजी मोठ्या आवाजाची यंत्रणा मिरवणुकीत आणण्याचा प्रकार घडत आहे. असे असले तरी करबल नृत्याने आगळी-वेगळी ओळख आजही आहे. 
 
करबल दंगल स्पर्धांचेही आयोजन 
या कलाप्रकारात गायक, सहगायक, पाच कलाकार, ढोल, ताशा व सनई वादक यांच्यासह सोळा ध्वजधारक सहभागी होतात. देवाच्या नावाने करबलाची सलामी दिली जाते. विशेष म्हणजे करबल दंगल स्पर्धाही विविध ठिकाणी आयोजित केल्या जातात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com