पिग आयर्न दरवाढीचा फाउंड्रीला मोठा धक्का ः 24 तासांत किलोस चार रुपयांची वाढ

 Pig iron price hike a big blow to the foundry
Pig iron price hike a big blow to the foundry

नागाव, कोल्हापूर  : पिग आयर्नच्या दरामध्ये चोवीस तासात चार रुपये प्रति किलो वाढ झाल्याने फाउंड्री उद्योगाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. दोन महिन्यात प्रति किलो दहा रुपये दर वाढल्याने उत्पादन थांबविण्याच्या मनस्थितीत लघु व मध्यम फाउंड्री उद्योजक आहेत. पिग आयर्न उत्पादनात मोजक्‍याच नामांकित कंपन्या कार्यरत असल्याने त्यांच्या एकाधिकाशाहीला आव्हान देण्यासाठी फाउंड्री उद्योजकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. 
जागतिक बाजारपेठेत वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये माफक किंमतीत सर्वाधिक सुविधा देण्यासाठी चढाओढ आहे. यामुळे या निर्मिती उद्योगांना पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना किमान किंमतीत कमाल गुणवत्ता द्यावी लागते. कच्च्या मालाच्या किमतींत मोठे बदल होत असतील, तर दर तीन महिन्यांनी पुरवठादार किमतींमध्ये बदल सुचवून दरवाढीची मागणी करू शकतात. मात्र गेल्या दोन महिन्यात पिग आयर्नच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ झाली आहे. ही सर्वात मोठी दरवाढ असून जानेवारी 2021 मध्ये ही दरवाढ मिळवता येणे शक्‍य आहे. 
दरम्यान जुन्या किमतींवर आधारित उत्पादन घेतल्यास प्रत्येक फाउंड्री उद्योगाला मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. याचाच विचार करून वाढीव किमतीने पिग आयर्न घेऊन नुकसान होणार असेल तर उत्पादन थांबवणे काही उद्योजकांना योग्य वाटत आहे. मात्र उत्पादन थांबवल्यास उद्योजकांना आणखीन काही अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याने उद्योजक चिंतेत आहेत. 

दोन महिन्यांपूर्वी उत्पादनावर दीड रुपयांची वाढ मिळाली होती. त्यानंतर पिग आयर्न, एमएस स्क्रॅप व बोरिंग यांच्या मोठी वाढ झाली. मात्र ही वाढ निर्मिती उद्योगाकडून लगेच मान्य होत नाही. ती होऊन येईपर्यंत कच्च्या मालाच्या दरात आणखीन वाढ झालेली असते. पण आत्ता झालेली वाढ उद्योगाला मोठा शॉक आहे. अशा परिस्थितीत खरोखरच उत्पादन घ्यायचे की नाही अशा मनस्थितीत आम्ही आहोत. 
- संजय भगत, कोहिनूर मेटॅलिक 

संपादन - यशवंत केसरकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com