कोल्हापूर : किशोरवयीन मुली वयात येताना त्यांच्या शालेय व सामाजिक जीवनात होणारे शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल लक्षात घेता शाळास्तरावर जिल्ह्यातील ८३३ पैकी ७७० शाळांमध्ये ‘पिंक रूम’ ही संकल्पना प्रभावीपणे सुरू केली आहे. .जिल्ह्यातील सहा ते १२ पर्यंतच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने पिंक रूम सुरू करण्याचे नियोजन असून, यामुळे मुलींच्या आरोग्य, सन्मान आणि शिक्षणातील सातत्याला हातभार लागणार आहे. .Kolhapur Muncipal : जिल्हाधिकाऱ्यांचा आढावा पूर्ण; कोल्हापूर जिल्ह्यात २१ डिसेंबरला नगरपालिका निकाल.पिंक रूम ही संकल्पना देशात आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यात राबवली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्तिकेयन एस. यांनी दिली. कार्तिकेयन एस. म्हणाले, ‘मासिक पाळीच्या काळात किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन बदलणे, प्रकृती ठीक नसल्यास थोडी विश्रांती घेणे, तसेच गोपनीय व सुरक्षित जागेची आवश्यकता असते..ही गरज लक्षात घेऊन पिंक रूम ही संकल्पना राबविण्यात येत आहे. पिंक रूम म्हणजे शाळेत उपलब्ध करून दिलेली स्वच्छ, सुरक्षित आणि गोपनीय जागा असून, याठिकाणी मुलींना आवश्यक त्या सुविधा मिळणार आहेत. .Kolhapur Rising addiction : फॅशनपासून व्यसनापर्यंतचा प्रवास: महाविद्यालयीन विद्यार्थिनी ‘स्मोकिंग-दारू’च्या विळख्यात, पालक हतबल.पिंक रूमच्या माध्यमातून मासिक पाळीदरम्यान योग्य स्वच्छतेची सवय लावणे, क्रीडा, योग व पीटी तासांमध्ये कपडे बदलण्याची सुविधा देणे, तसेच मुलींमध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.’ यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर उपस्थित होत्या..अशी असणार आहे पिंक रूम उच्च प्राथमिक शाळांमध्ये स्वतंत्र पिंक रंगाने रंगविलेली वर्गखोली, स्वच्छ पिण्याचे पाणी, वॉश बेसिन, आरसा, सॅनिटरी नॅपकीन, वेस्ट बिन (डिस्पोजल मशीन असल्यास अधिक चांगले), फर्स्ट एड बॉक्स आणि सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत..तसेच योग्य वायुविजन, प्रकाश व्यवस्था, सुरक्षित दरवाजा व लॉक, दोन खुर्च्या किंवा बेंच, चटई आणि सुस्थितीतील जुने शालेय गणवेश ठेवण्याची सोय असणार आहे. पिंक रूमची नियमित स्वच्छता व शालेय आरोग्य समितीद्वारे तपासणी केली जाणार असल्याचेही कार्तिकेयन एस. यांनी सांगितले..जिल्ह्यात तालुकानिहाय तयार केलेल्या पिंक रूमतालुका पिंक रूम शाळाआजरा ५४भुदरगड ७०चंदगड ८८गडहिंग्लज ४८गगनबावडा १६.हातकणंगले ७७कागल ६९करवीर ९३पन्हाळा ८९राधानगरी ६८शाहूवाडी ८५शिरोळ ७६एकूण ८३३ .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.