esakal | चंदगडात रंगीबेरंगी खेकड्याची चर्चा; यंदा प्रथमच दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगडात रंगीबेरंगी खेकड्याची चर्चा; यंदा प्रथमच दर्शन

चंदगडात रंगीबेरंगी खेकड्याची चर्चा; यंदा प्रथमच दर्शन

sakal_logo
By
सुनील कोंडुसकर

चंदगड : शहराच्या (chandagad) पश्‍चिम दिशेला कोकरे अडुरे गावच्या हद्दीत बावाचा मठ नावाच्या शेतात गुलाबी, पिवळ्या रंगाचा खेकडा आढळला आहे. त्याच्या कवटीचा रंग गुलाबी असून, पाय पिवळे आहेत. या विभागात सामान्यतः काळसर- हिरवट रंगाचे खेकडे सापडतात. परंतु, हा रंगीबेरंगी खेकडा (colourful crab) सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. बावाचा मठ परिसर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या (sindhudurg district) हद्दीवर येतो. या परिसरात बॉक्साईटची खाण होती. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला मोठ्या प्रमाणात खेकडी बाहेर पडतात. मात्र, सामान्यतः ती काळसर- हिरवट रंगाची असतात. या वर्षी प्रथमच गुलाबी-पिवळसर रंगाचे खेकडे दिसून आले. त्याची कवटी व नांगे गुलाबी रंगाचे असून, पाय पिवळ्या रंगाचे आहेत. पायावर बहुकोनीय नक्षी आहे.

खेकडा हा उभयचर प्राणी आहे. त्याला आठ पाय आणि दोन नांग्या असतात. नांग्यांचा उपयोग संरक्षणासाठी केला जातो. समुद्रात आणि गोड्या पाण्यात खेकडे आढळतात. जगात त्याच्या चार हजारांहून अधिक प्रजाती आहेत. दरम्यान, या खेकड्याची प्रतिमा इंटरनेटवर जाऊन शोध घेतली असता आतापर्यंत संशोधन झालेल्या अन्य प्रजातींची जुळत नाही. त्यामुळे ही नवीनच प्रजाती असण्याची शक्यता आहे. यासंदर्भात संशोधन होणे गरजेचे आहे.

हेही वाचा: सावधान! यंदाही आंबोली पर्यटनाला जाणार असाल तर होणार कारवाई

"गेली २० वर्षे शेतात वास्तव्याला आहे. परंतु, आतापर्यंत रंगीबेरंगी खेकडे पाहिले नव्हते. या वर्षी प्रथमच ते पाहायला मिळाले. त्याचा आकार व चालणे सामान्य खेकड्याप्रमाणेच आहे. मात्र, त्याचा रंग खूपच आकर्षक आहे."

- कृष्णकांत पिलारे

loading image