कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी कोल्हापुरात दाखल झालंय 'हे' मशिन...

Plasma collecting machines available at CPR Hospital Blood Bank
Plasma collecting machines available at CPR Hospital Blood Bank
Updated on

कोल्हापूर - अतीगंभीर अवस्थेतील कोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा उपचार करून त्यांना बरे करण्यासाठी शासकीय डॉक्‍टर्सचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला बळ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने येथील सीपीआर रूग्णालय रक्तीपेढेत प्लाझ्मा संकलन करणारे 'अफेरीरीस मशिन' उपलब्ध केले आहे. या मशिनचा वापर करून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील दोन कोरोना मुक्त व्यक्तींचा प्लाझ्मा घेण्यात येणार आहे. या नव्या सुविधा व प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञाना आधारे प्लाझ्मा वापरून कोरोनाग्रस्त रूग्ण बरा करण्याचा थेट पहिला प्रयोग सीपीआर रूग्णालयात यशस्वी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या नव्या थेरपी बाबत डॉ. वरूण बाफना म्हणाले की, "कोरोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी प्लाझ्मा उपचार पध्दतीचा अवलंब करण्याबाबत संशोधन झाले आहे. यात कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींच्या रक्तातील प्लाझ्मा घेऊन त्याचा वापर इतर गंभीर कोरोनाग्रस्त रूग्णातील कोरोना संसर्ग घालविण्यासाठी होतो. त्यासाठी कोरोना ग्रस्त व्यक्तीवर उपचार सुरू असताना त्यातून त्याच्या शरिरात ऍन्टीबॉडीज (प्रतिजैवीक) तयार होतात. अशी प्रतिजैवीके प्लाझ्मा व्दारे संकलीत करून तरी दुसऱ्या अती गंभीर कोरोनाग्रस्ताचा संसर्ग कमी करण्यासाठी वापरतात.
अशा उपचार पध्दतीचा वापर जो कोरोनाग्रस्त व्हेन्टीलेटरवर आहे किंवा गुंतागुंतीच्या आजारातील आहे. अशा रूग्णाला वाचविण्यासाठी केला जातो. असेही डॉ. बाफना यांनी सांगितले.

गरजेनुसार प्लाझ्मा संकलन

गेल्या चार दिवसापूर्वी अथायु हॉस्पीटलमधून कोरोना बरा झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा कांही दिवसापूर्वी संकलीत केला होता. त्यात अथायु हॉस्पीटल व सीपीआर रूग्णालयाच्या डॉक्‍टरांनी संकलन केले होते. त्याचाच पुढील भाग म्हणून जिल्हा प्रशासन व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मदतीतून सीपीआर रक्तपेढीसाठी प्लाझ्मा संकलनासाठी अफेरेसिस मशिन सुविधा आज येथे उपलब्ध केली, येथून पुढे गरजेनुसार प्लाझ्मा संकलन सुविधा तयार झाली. खासगी डॉक्‍टर व शासकीय डॉक्‍टर, पॅथॉलाजीस्ट आदी तज्ञांच्या सहयोग, अनुभव व संशोधनाचा वापर करून गरजेनुसार प्लाझ्मा उपचार पध्दतीचा अवलंब होणार आहे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मान्यतेने हा प्रयोग होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, डॉ. विजय बर्गे, डॉ. महेंद्र बनसोडे, डॉ. परितेकर, सीपीआर रक्तपेढीचे डॉक्‍टर्स आदींच्या सहयोगाने प्लाझ्मा संकलन झाले.

600 मिली प्लाझ्मा संकलन

28 दिवसापर्यंत हा प्लाझा ठेवता येतो. तो प्लाझ्मा व्हॅक्‍सीनव्दारे अन्य कोरोनाग्रस्ताला देण्यात येतो. त्यानंतर दुसऱ्या कोरोनाग्रस्ताच्या शरिरातही ऍन्टीबॉडीज तयार होऊन यातून कोरोना संसर्ग विषाणू कमी होण्यास मदत होते. त्यासाठी कोरोना मुक्त व्यक्तीचे 600 मीली प्लाझ्मा घेतले आहे. त्यासाठी प्रत्येकी 300 मीलीच्या दोन पाऊच संकलीत केले आहे.

अति गंभीर कोरोनाग्रस्तावर प्लाझ्मा उपचार

कोल्हापूरात कोरोनाचे सात रूग्ण उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती ठिक आहे. त्यामुळे त्याच्यावर सद्या प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्याची आवश्‍यकता नाही मात्र कोणी अतीगंभीर अवस्थेतील कोरोना ग्रस्त आला तर त्यांच्यावर मात्र या थेरपीचा वापर करणे शक्‍य होणार आहे असेही डॉ. बाफना यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com