

PM Kisan 2000 rupees installment stopped for fake farmers
esakal
PM Kisan Scheme Fraud : ओंकार धर्माधिकारी : कोल्हापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनाचा लाभ घेणाऱ्या साडेतीन हजार व्यक्तींची छाननी सध्या सुरू आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात सुमारे दोन हजार लाभार्थी हे पती-पत्नी असून, त्या दोघांनाही नियमबाह्यपणे योजनेचा आर्थिक लाभ मिळत आहे. काही जणांकडे शेती नसूनही ते लाभार्थी असल्याचे समोर आले. त्यामुळे छाननीनंतर नियमबाह्यपणे लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.