जोतिबा डोंगर : जोतिबा मुख्य यात्रेदिवशी (ता. १२) दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या (Jyotiba Chaitra Yatra) शासकीय पूजाविधीला सहा पुजारी व चार शासकीय अधिकारी अशा दहा जणांना मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार आहे. जोतिबा देवाच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया झाल्याने गाभाऱ्यात आर्द्रता वाढू देऊ नका, अशी सूचना भारतीय पुरातत्त्व विभागाने (Department of Archaeology) केल्याने खबरदारी म्हणून केवळ दहाजणांना पास देऊन गाभाऱ्यात सोडले जाणार आहे.