
कोल्हापूर : विविध तपासातील जप्त केलेल्या बेवारस वाहनांचा लिलाव आज झाला. जिल्ह्यातील ३८९ वाहने, ज्यामध्ये ३८५ दुचाकी व चारचाकी अशा वाहनांचे वाहन मालक मिळाले नाहीत, अशा वाहनांची प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून वाहनांची किंमत निश्चित केली गेली. अशा ३८९ बेवारस वाहनांचा एकत्रित लिलाव हा पोलिस मुख्यालयातील मैदानावर झाला. स्क्रॅपमधून २२ लाख पंधरा हजार रुपये मिळाले.