"अस्तित्व लपविण्यासाठी कोरटकरने चंद्रपूरच्या धीरज चौधरी याची मोटार वापरली आहे. तो बुकी मालक आहे. त्याच्यासोबत आणखी कोणी कोणी त्याला सहकार्य केले, याचा तपास झालेला नाही."
कोल्हापूर : बुकी मालक धीरज चौधरीची आलिशान मोटार प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) अस्तित्व लपवण्यासाठी वापरत होता. त्यामुळे त्याचे कोणाकोणाशी संबंध आहेत, त्याला कोणत्या संघटनांचा पाठिंबा आहे, त्याने किती मोटारी वापरल्या, हॉटेलचे बिल कोणी दिले, कोणाच्या नावावर राहिला, याचा तपास करण्यासाठी कोरटकरला आणखी पाच दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी पोलिसांनी (Kolhapur Police) केली. न्यायालयाने युक्तिवादानंतर पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली.