esakal | इचलकरंजीत पोलिसांचा छापा
sakal

बोलून बातमी शोधा

Police raid in Ichalkaranji

येथील शास्त्री सोसायटीतील घरात सुरू असलेल्या कल्याण मटका अड्ड्यावर आज दुपारी शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून 61 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित 25 जणांवर गुन्हा नोंद केला आहे. दोन दिवाणजींसह घरमालकाला अटक केली. याप्रकरणी संभाजी पाटील, शिवाजी पाटील (रा. गणपती कट्ट्याजवळ), निलेश देसाई या मटकाबुकींसह 19 एजंटावर गुन्हा नोंद केला आहे.

इचलकरंजीत पोलिसांचा छापा

sakal_logo
By
पंडित कोंडेकर

इचलकरंजी : येथील शास्त्री सोसायटीतील घरात सुरू असलेल्या कल्याण मटका अड्ड्यावर आज दुपारी शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून 61 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित 25 जणांवर गुन्हा नोंद केला आहे. दोन दिवाणजींसह घरमालकाला अटक केली. याप्रकरणी संभाजी पाटील, शिवाजी पाटील (रा. गणपती कट्ट्याजवळ), निलेश देसाई या मटकाबुकींसह 19 एजंटावर गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिलेली माहिती अशी, जवाहरनगर येथील शास्त्री सोसायटीमध्ये खोलीत एजंटांकडून मोबाईलवर कल्याण मटका घेण्यात येत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकून मारुती परशराम देसाई (गणेशनगर) व बसाप्पा विनायक माळगे (आदर्श झोपडपट्टी) या दोन दिवाणजींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील चौकशीत संभाजी पाटील, शिवाजी पाटील व निलेश देसाई या बुकींची नावे पुढे आली. अड्डा असलेल्या घराचे मालक सचिन शिवाजी ढेंगे यांचे नाव निष्पन्न झाले. या तिघांना अटक केली. कारवाईत दोन मोबाईल, दोन कॅल्क्‍यूलेटर, बॉलपेन, मोटारसायकल, 3800 रोकड असा 61 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 
जप्त केलेल्या मोबाईलमधून 19 एजंटांची नावे निष्पन्न झाली. त्यांच्यावरही गुन्हा नोंद केला आहे. यातील बहुतांशी नावे अपूर्ण आहेत. त्यांची सविस्तर नावांची माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत करीत होते. गुन्हा नोंद झालेल्या एजंटांची नावे अशी ः व्हीपी, अनिल, अण्णा, दीपक, शिवाजी ढेंगे, रानभरे, सलीम, बाबर, एकांडे, कडाळे, शिंदे, पावले, राहुल, अशोक पाटील, शब्बीर, शेख, आदमापूर, रफिक, दिलीप पाटील. 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

loading image
go to top