esakal | तोतया पोलिसांकडून पिस्तूलसह दुचाकी जप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

Police seize two wheeler with duplicate pistol

शीटखाली एक गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. पोलिसांनी पिस्तूल जप्त केले असून हे कोठून उपलब्ध झाले याचा शोध घेत आहेत.

तोतया पोलिसांकडून पिस्तूलसह दुचाकी जप्त 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - शहापूर पोलिसांनी काल अटक केलेल्या कर्नाटकातील दोन तोतया पोलिसांकडून गावठी बनावटीच्या एका पिस्तूलसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 55 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांनी आणखी गुन्हे केले आहेत काय, याचा सखोल तपास शहापूर पोलिस करीत आहेत. याबाबतची माहिती आज पोलिस निरीक्षक प्रकाश निकम यांनी पत्रकारांना दिली. 

तारदाळ येथे एका घरात घुसून कर्नाटक पोलिस असल्याची बतावणी करीत घरझडती घेण्याचा प्रयत्न दोन तोतया पोलिसांनी केला होता. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर शहापूर पोलिसांनी दोघांना अटक केली होती. मोहन सुरेश पवार (वय 20, रा. साखरवाडी, निपाणी) व प्रकाश मारुती कुंभार (नाईंग्लज, ता.चिकोडी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायलयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील मोहन पवार याच्यावर तोतया पोलिस असल्याचा गुन्हा निपाणी पोलिसांत दाखल आहे. 

दरम्यान, त्यांच्याकडून जप्त केलेल्या दुचाकीची तपासणी शहापूर पोलिसांनी केली. त्यामध्ये शीटखाली एक गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. पोलिसांनी पिस्तूल जप्त केले असून हे कोठून उपलब्ध झाले याचा शोध घेत आहेत. तसेच या पिस्तूलचा वापर करून आणखी कोणते गुन्हे केले आहेत काय, याचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निकम यांनी दिली. 

हे पण वाचा -  ह्रदयद्रावक! आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दाम्पत्याचा शेवटही सोबतच

 निकम यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकात उपनिरीक्षक जी.के. खराडे, हवालदार महेश कोरे, ज्ञानेश्‍वर बांगर, अमर पाटील, सुनील बाईत, अमर कदम, अमित भोरे यांचा समावेश आहे. 

 
संपादन - धनाजी सुर्वे 

loading image