VIDEO: जितेंद्र आव्हाडांची गाडी आली... आणि पोलिसाने दिला रट्टा!

jitendra awhad news
jitendra awhad news
Updated on

नेते मंडळी शहरात किंवा गावात आली की मोठा तामझाम असतो. व्हिआयपी गाड्यांचा ताफा, कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांचं वेटोळं, यामध्ये मंत्री थाटात कार्यक्रमांना उपस्थिती लावत असतात. मात्र याच नेत्यांना सत्तेत बसवणाऱ्या सर्वसामान्यांना मिळणारी वागणूक कशी असते, याचा प्रत्यय कोल्हापुरात आला आहे. (jitendra Awhad in Kolhapur)

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड एका कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आले होते. यावेळी ते शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही भेटले. 'आमचं ठरलंय', असं म्हणत दोन्ही नेत्यांनी माध्यमांना बातम्या दिल्या. मात्र, मंत्री महोदयांचा ताफा पुढे सरकवण्यासाठी पोलिसांनी घेतलेले 'विशेष कष्ट' कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. (Jitedra Awhad Latest News)

कोल्हापुरात आव्हाडांच्या गाड्यांच्या ताफ्याला ट्र्रॅफिकचा सामना करावा लागला. रस्ता मोकळा करण्यासाठी स्थानिक पोलीस उपस्थित होते. आव्हाडांच्या गाड्या येताच एका पोलीस कर्मचाऱ्याने चारचाकीत बसलेल्या चालकाला गाडी बाजूला घेण्यासाठी आवाज दिला. चालक हे करत असतानाच पोलिसाने मागून धावत येत या ड्रायव्हरच्या कानशिलात लगावली. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या संबधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakal 46th Foundation Day Celebration Professor S Mahendra Dev Stresses Sustainable Growth Through Agriculture Industry
Fulfilling an Old Pact
Prakash Abitkar Ambabai temple conservation news
Kolhapur farmer loan waiver latest news
Marathi News Esakal
www.esakal.com