सम्राट कोराणेला सुनावणीनंतर न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरून खाली नेताना चारही मजल्यावरून त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. अखेर पोलिसांनी सर्वांना बाजूला हटकले.
कोल्हापूर : फरार कालावधीत मटका मालक सम्राट कोराणेकडे (Samrat Korane) १६ लाख रुपये कोठून आले, कोठे खर्च केले, यासह पत्नीच्या नावे नागाळा पार्क येथील फ्लॅटची खरेदी, मटका मालक पप्पू सावलाशी असलेल्या संबंधांचा तपास करावयाचा असल्यामुळे त्याला पोलिस (Kolhapur Police) कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी मंगळवारी न्यायालयात (Court) केली.