अखेर पोलिसांना पाचारण केले गावात अन् त्या 22 जणांना स्वॅब देण्यासाठी पाठविले...

Police were called and the last people were sent to the village to give swabs
Police were called and the last people were sent to the village to give swabs
Updated on

कळे - येथील ग्रामदक्षता समितीने कोरोना संसर्गित व्यक्तीच्या संपर्कातील ग्रामस्थांना स्वॅब तपासणीसाठी नेत असताना संबंधितांनी कडाडून विरोध केला. आपला रुग्णाशी संपर्क आला नसून समितीने संपर्कातील व्यक्तींची नावे जाणीवपूर्वक यादीतून वगळल्याचा आरोपही केला. दोन दिवस चाललेल्या या प्रकरणात समितीला कळे पोलिसांना पाचारण करून अखेर २२ जणांना स्वॅब देण्यासाठी पाठविले.

येथील व्यापारपेठेतील संसर्ग झालेल्या वृद्धाच्या कुटुंबातील प्रथम संपर्क आलेले आठ जण पॉझिटिव्ह आल्यानंतर द्वितीय संपर्कातील लोकांची तपासणी करणे आवश्‍यक होते; पण कोणीही सहकार्य करत नव्हते. बाधिताशी कोणताही संपर्क नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. दक्षता समितीने रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची नावे जाणीवपूर्वक यादीतून वगळल्याचा आरोपही त्यांनी केला. आमचा रुग्णाशी संपर्क नसल्याने स्वॅब देणार अशी भूमिका घेतली.

आशा, आरोग्य केंद्राचे कर्मचारी व दक्षता समिती सदस्य तीन दिवस त्यांना भेटून स्वतःहून तपासणी करावी व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करत होते. अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी तपासणीसाठी जाण्याविषयी संबंधित ग्रामस्थांना तोंडी सूचना दिल्या.सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले, मंडल अधिकारी सुरेश ठाकरे, तलाठी संदीप कांबळे, ग्रामविकास अधिकारी आर. आर. पाटील, तंटामुक्तचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह कळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

होमक्वारंटाईनची बोली

स्वॅब देऊन पुन्हा होम क्वारंटाईनसाठी परत येण्याच्या बोलीवर संपर्कातील लोकांनी तयारी दाखवली. काहींनी खासगी तपासणी लॅबमध्ये तपासणी करणार असल्याचे सांगितले. काहींनी स्वतःच्या वाहनातून केअर सेंटरमध्ये जाणे पसंद केले. उर्वरितांची शासनाच्या गाडीतून पन्हाळा येथील एकलव्य पब्लिक स्कूलमधील कोविड सेंटरमध्ये रवानगी केली.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com