रांगडा गडी म्हणतोय खोकं एवढंच कसं!

तुल्यबळ उमेदवारांमुळे विधान परिषद निवडणुकीत चुरस निर्माण झाली
politics
politicssakal media
Summary

तुल्यबळ उमेदवारांमुळे विधान परिषद निवडणुकीत चुरस निर्माण झाली

विधानपरिषद निवडणूक...

तुल्यबळ उमेदवारांमुळे विधान परिषद निवडणुकीत चुरस निर्माण झाली आणि मतदारांच्या अपेक्षाही वाढल्या. नेत्यांच्या जीवावर पदे भोगूनही निवडणुकीत खोक्याची सवय लागलेल्या काही मतदारांचे तऱ्हेवाईक किस्से आता बाहेर पडू लागले आहेत. त्यातील काही...

लाल दिवा देऊनही म्हणतो घेतली तर २० खोकीच

विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाली असली तरी त्यातील अनेक किस्‍से मात्र पुढे येत आहेत. अनेक आश्‍चर्यकारक गोष्‍टी पडद्यामागे घडल्या असून पुढे काही दिवस याचीच चर्चा रंगणार आहे. अशाच एका उचलीची चर्चा सध्या सुरू झाली आहे. एका माजी पदाधिकाऱ्याला सर्वांप्रमाणेच पाच खोक्यांची उचल दिली. मात्र घेतली तर २० खोकी अन्यथा नको, असा पवित्रा त्यांनी घेतला. दरम्यान अर्ज माघारीच्या दिवशी विरोधी उमेदवारांनी माघार घेतली आणि अचानकच निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे पाच, दहा खोकी नाकारणाऱ्या या पदाधिकाऱ्याच्या फजितीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

politics
सोयाबिन विकण्याची घाई नको; राजु शेट्टींचं शेतकऱ्यांना कळकळीचं आवाहन

मागील निवडणुकीप्रमाणेच यावेळच्या निवडणुकीतही रिवाजाप्रमाणे टोकन वाटप केले. एका माजी पदाधिकाऱ्याकडे टोकन वितरण करणारी मंडळी पोहेाचली. टोकनची रक्‍कम ऐकूनच ऑफर धुडकावली. संबंधित उमेदवार आपले जवळचे नातेवाईक असल्याने आपणाला टोकनची गरज नसल्याचे सांगत समोरच्यावर ‘पावशर’ मारण्यास ही व्यक्‍ती विसरली नाही. त्यामुळे गुपचूप १० खोक्यांची ऑफर दिली. ती देखील फेटाळून लावत २२ खोक्यांची मागणी केली. त्यामुळे टोकन वाटणाऱ्यांना दिवसा घाम फुटायची वेळ आली. अखेर उमेदवारांनीच अर्ज माघारीनंतर मतदारावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. अर्ज माघारी दिवशी विरोधकांनीच माघार घेतली, अन अचानकच निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे या २२ खोकीवाल्याची अवस्‍था मात्र हा ही गेले.... अशी झाली.

रांगडा गडी म्हणतोय खोकं एवढंच कसं!

एका मोठ्या पदावर राहिलेल्या रांगड्या मतदाराने तर कहरच केला. उमेदवार असलेल्या नेत्याने त्यांना लाल दिव्यापर्यंत पोहोचवले; मात्र रांगडे, रांगडे म्‍हणत त्यांनी अनेकांना ‘रांगायला’ लावले. निधी वाटपात असा काही पराक्रम केला की अधिकाऱ्यांच्या ‘नोकऱ्या’ जाण्याची वेळ आली. या सर्व प्रकरणातून नेत्यांनी त्यांना सहिसलामत बाहेर काढले. या सर्वाबद्दल कृतज्ञता बाळगायची सोडून विधान परिषद निवडणुकीत पहिली उचल करायला, या रांगड्या गड्याने मागे पुढे पाहिले नाही. सर्वांबरोबर पहिली उचल घेतानाच कारभाऱ्यांना एवढेच काय असे विचारून चकित केले. आता निवडणूकच बिनविरोध झाल्याने या रांगड्या गड्याच्या पराक्रमाचा योग्य तो सन्‍मान करण्याचा निर्णय कारभाऱ्यांनी घेतला आहे.

politics
'कोल्हापुरात कुणी कितीही गप्पा मारल्या तरी सतेज पाटीलच जिंकणार होते'

आधी निवडणुकीचा धक्का मग दिला बसने धक्का...

मतदार विरोधकांच्या हाती लागू नयेत म्‍हणून हक्‍काचे मतदार पहिल्यांदा सहलीवर पाठवले. या मतदारांपर्यंत विरोधकांना पोहोचता येऊ नये म्‍हणून दूरवर सहलीचे नियोजन केले. मधूनच कोणी दांडी मारू नये म्‍हणून सर्वांसाठी ट्रॅव्‍हलसची व्यवस्‍था केली. निवडणूक दूर असल्याने रिसॉर्टमध्ये मतदार फूल टू एन्‍जॉय करत होते. मात्र शुक्रवारी बिनविरोधची बातमी आली आणि मतदारांच्या पायाखालची वाळूच सरकली. रिसॉर्टमध्ये एन्‍जॉय करणाऱ्या मतदारांच्या चेहऱ्यावर दु:खाची छाया पसरली. त्यातून सावरण्यापूर्वीच बॅगा भरण्याच्या सूचना आल्या. रडत कढत बॅगा ट्रॅव्हल्‍समध्ये ठेवल्या. मात्र ट्रॅव्‍हल्‍सनेही गंमतच केली. काही अंतर गेले की बंद पडणाऱ्या ट्रॅव्‍हल्‍सला धक्‍का देण्याची वेळ मतदारांवर आली. जर मतदान असते तर प्रवासासाठी फाईव्‍ह स्‍टार व्यवस्‍था केली असती. आता निवडणूकच बिनविरोध झाल्याने मतदारांकडे बघणार कोण, अशी स्‍थिती निर्माण झाली. त्यामुळे दुसरा, तिसरा हप्‍ता नको पण यायची तरी चांगली व्यवस्‍था करा, म्‍हणण्याची वेळ सहलीवरील मतदारांवर आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com