
कोल्हापूर : रंकाळा तलावात मेलेल्या माशांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज पुन्हा पाहणी केली. तसेच पाण्याचेही नमुने घेतले आहेत. याबाबत पूर्वीही मंडळाने व महापालिकेने नमुने घेतले असून, त्याचे अहवाल मात्र अद्यापही आलेले नाहीत. मंडळ व महापालिकेने त्याबाबतची माहिती स्पष्टपणे प्रसिद्ध करण्याची गरज आहे.