esakal | दिलासादायक! कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर
sakal

बोलून बातमी शोधा

दिलासादायक! कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर

दिलासादायक! कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : पूर्वीच्या तुलनेत यंदा कोरोना चाचण्यांची संख्या वाढविली आहे. ही संख्या वाढवूनही जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आला आहे. १८ टक्क्यांवर पॉझिटिव्हिटी रेट येणे ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने सकारात्मक आल्याचे दिसून येते. आतापर्यंत जिल्ह्यात कोविडमुळे २८६५ इतके रुग्ण दगावले, मात्र यातील ५० टक्के मृत्यू हे ६० ते ७० वर्षे वयोगटातील होते. या मृत ५० टक्क्यांमधील सुमारे ७० टक्के मृत्यू व्याधीग्रस्तांचे झाले असल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीस दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ४२ लाख ४५ हजार २१५ इतक्या लोकसंख्येपैकी केवळ जिल्ह्यातील १ लाख १२४ कोरोनाबाधित झाले होते. त्यापैकी ८१ हजार ६४३ रुग्ण बरे झाले असून २५ मेअखेर केवळ १४ हजार ८४४ इतके सक्रिय रुग्ण आहेत. कोविड रुग्ण उशिराने रुग्णालयात दाखल होणे, घरीच उपचार करणे, कोविडबद्दल स्पष्टपणाने न सांगणे, सामाजिक भीती अशी अनेक कारणे या रुग्णांच्या मृत्यूच्या पाठीमागे आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येत लगतच्या जिल्ह्यातील रुग्णांचीही भर पडल्याने ही संख्या वाढली आहे. पहिल्या लाटेत सर्व साधारणपणे २८ टन ऑक्सिजन लागत होता, तर यंदा कोविड रुग्णांसाठी सुमारे ५२ टन म्हणजे ऑक्सिजन उपलब्ध केला. इतर राज्ये तसेच राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्याचा लोकसंख्येच्या प्रमाणात येथील मृत्यूदर कमी होता.

हेही वाचा: 'फुले जनआरोग्य' मध्ये 15 टक्के रुग्णांनाच उपचार

प्रशासकीय यंत्रणा सज्ज

पहिल्या लाटेत जिल्ह्यात २ हजार ३९६ ऑक्सिजन, ३५० आयसीयू, तर १४० व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होते. दुसऱ्या लाटेत ३ हजार १७४ ऑक्सिजन, ६४८ आयसीयू तर ३०० व्हेंटिलेटर बेड उपलब्ध केले. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यातील १७ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २१ ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये त्याचबरोबर सर्व कोविड सेंटरवर आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुना तपासणीची सोय केल्याने बाधितांची संख्या वाढली. सध्या जिल्ह्यात ८३ कोविड काळजी केंद्रे, ९३ समर्पित तर १२ कोविड समर्पित दवाखाने उपलब्ध आहेत.