esakal | 'फुले जनआरोग्य' मध्ये 15 टक्के रुग्णांनाच उपचार; रुग्णालयांची संख्या कमी
sakal

बोलून बातमी शोधा

'फुले जनआरोग्य' मध्ये 15 टक्के रुग्णांनाच उपचार

'फुले जनआरोग्य' मध्ये 15 टक्के रुग्णांनाच उपचार

sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर : कोरोनाची दुसरी लाट जानेवारीत आली. तेव्हापासून आजवर ३ हजार ५६६ व्यक्तींना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत उपचार मिळाले, तर ७ कोटींची बिले रुग्णालयाला मिळाली आहेत. जिल्ह्यातील २३ रुग्णालयांत कोरोनावर योजनेअंतर्गत उपचार होतात, मात्र योजनेत समाविष्ट रुग्णालय व बेडची संख्या मोजकीच आहे. परिणामी १० ते १५ टक्के रुग्णांना मोफत उपचार मिळाले आहेत. जिल्ह्यातील गंभीर बाधितांची वाढती संख्या पाहता, जम्बो कोविड सेंटर सुरू करून या योजनेअंतर्गत मोफत उपचाराला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे.

जिल्ह्यात ५३ शासकीय व खासगी रुग्णालयात ही योजना आहे. यातील २३ रुग्णालयांत योजनेअंतर्गत कोरोनावर उपचार होतात. यंदा जानेवारीपासून सीपीआरमधील ५०० बेड भरून गेले. खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटर, ॲक्सिजन बेडची कमतरता आहे. रोज ३०० ते ४०० रुग्ण गंभीर बाधित सापडतात. ज्यांना शासकीय रुग्णालयात बेड मिळत नाहीत, त्यांना खासगीत जावे लागते. तेथे होणार ५० हजार ते दोन लाखांपर्यंतची बिले भागविणे शक्य होत नाही. अशा रुग्णांची संख्या रोजची २०० असते, मात्र त्यामुळे योजनेअंतर्गत मोफत उपचाराचा लाभ देण्यासाठी हॉस्पिटलची संख्या कमी पडत आहे.

हेही वाचा: व्यथा कुटुंबाच्या; मी रक्ताच्या नात्यातील सात माणसं गमावलेत

अनेक गरजू रुग्ण खासगीत पैसे शिल्लक असेपर्यंत उपचार घेतात. पैसे संपले, की गंभीर रुग्णाला खासगीतून शासकीय नेतात. परिणामी अतिगंभीर रुग्ण शासकीयमध्ये आल्यानंतर मृत झाल्याची उदाहरणे आहेत. खासगीत उपचारांचे बिल भरणे परवडत नसल्याने दररोज दोन ते दहा गंभीर रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल होतात. त्यातील चार ते पाच रुग्ण दगावतात यातूनही मृत्यूचा दर वाढला आहे.

"जानेवारीपासून ३ हजार ५६६ रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत उपचार झाले आहेत. उपचाराचा खर्च सात कोटींपर्यंत झाला असून, तो योजनेतून करण्यात येत आहे. योजनेतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठे असल्याने योजनेचा चांगला लाभ होत आहे. योजनेतून जास्ती जास्त लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न आहे.’’

- डॉ. सुभाष नांगरे, जिल्हा समन्वयक, महात्मा फुले जनआरोग्य योजना

हेही वाचा: मेहुल चोक्सीला भारताच्या ताब्यात देणार - एंटिग्वा PM