
कोल्हापूर : जिल्ह्यात आजघडीस कोरोनाची रुग्णसंख्या अत्यंत कमी झाली आहे. मात्र, ही परिस्थिती अशीच पुढे राहण्याची शक्यता नाही. आरोग्य विभागाने उपलब्ध माहितीच्या आधारे केलेल्या विश्लेषणानुसार नवीन वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. यात जुलै ते ऑक्टोबर या काळात रुग्णसंख्या सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे. असे असले, तरी दुसऱ्या लाटेपेक्षा ही रुग्णसंख्या कमी राहण्याचे संकतेही दिले आहेत. तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्या ही ऐनभरात दरदिवशी ८५० इतकी होण्याची शक्यता वर्तवली आहे. या लाटेचा धोका कमीत कमी राहण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण होणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. सध्या दररोज कोरोनाचे एक, दोन रुग्ण सापडत आहेत. ग्रामीण भागात तर एकही रुग्ण सापडत नाही, अशी परिस्थिती आहे. एकूणच कोरोनाची भीती कमी झाल्याने सर्रास नियमांचे उल्लंघन होत आहे. बाजारापेठा पूर्वपदावर आल्या आहेत. कोरोना कमी झाल्याने नाकावरचे मास्क हनुवटीला गेले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्याने लसीकरणाचे कामही संथगतीने सुरू आहे. जेवढे लसीकरण कमी तेवढा तिसऱ्या लाटेचा धोका अधिक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.
कोरोनाची तिसरी लाट ही २०२२ मध्ये एप्रिलमध्ये येण्याची शक्यता आहे. यामध्ये ज्यांचे लसीकरण झालेले नाही, दुसरा डोस झालेला नाही त्यांना संसर्गाची भीती अधिक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सध्या शून्य ते १७ या वयोगटाचे लसीकरण झालेले नाही. तसेच १८ ते ४५ वयोगटातील लसीकरणही कमी झाले आहे. दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक फिरकत नसल्याचे चित्र आहे. याचा फटका शून्य ते १७ वयोगटाला बसेल, असा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. कोरोनाची तिसरी लाट आली तरी ती दुसऱ्या लाटेपेक्षा कमी तीव्रतेची राहील.
दृष्टिक्षेपात...
लसीकरणाची टक्केवारी वाढली तर धोका कमी
दोन्ही डोसचे लसीकरण ५० टक्क्यांवर
शून्य ते १७ वयोगटात राहणार सर्वाधिक बाधित
एका दिवसातील सर्वोच्च रुग्णसंख्या ८५०
पहिल्या लाटेसारखीच परिस्थिती
"कोरोनाचे रुग्ण सध्या जरी कमी असले, तरी पुढील काळात रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात एप्रिलपासून रुग्णसंख्या वाढेल, असा अंदाज आहे. मात्र, तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेइतकी मोठी नसेल. या वेळी शून्य ते १७ वयोगटात बाधित होणाऱ्यांचे प्रमाण इतरांच्या तुलनेत अधिक राहील. आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे."
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.