रंगद्रवे मिश्रीत पाण्याचा पुनर्वापर शक्य; वस्त्रनिर्मितीतील रसायनांवर नॅनो मटेरियल्सचा वापर

Possible water recycling kolhapur news
Possible water recycling kolhapur news

कोल्हापूर - वस्त्रनगरीत तयार होणाऱ्या दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया करताना शिल्लक राहणारे रंगद्रव्ये ही अनेक पातळ्यांवर धोकादायक ठरतात. अशा विषद्रव्यांचा नायनाट करणारे संशोधन प्रा. डॉ. कल्याणराव गरडकर यांनी केले आहे. यात टिटानियम ऑक्‍साईड यासारख्या नॅनो मटेरियल्सचा वापर करून फक्त सूर्यप्रकाशाच्या मदतीने रंगमिश्रीत पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी पुनर्वापर करण्यायोग्य बनविले आहे. यामुळे अनेक देशांतील दूषित सांडपाणी समस्येवर उपाय म्हणून उपयुक्त ठरते आहे. याच बळावर त्यांना चीनमध्ये संशोधन करण्यासाठी इन्सा फेलोशिप मिळाली होती.

वस्त्रनिर्मिती करताना त्यात रासायनिक रंगद्रव्ये सोडली जातात. वस्त्र तयार झाल्यानंतर हे दूषित पाणी नदीत सोडण्यापूर्वी कॉमन ईफ्लुएंट ट्रिटमेंट प्लांटमध्ये फोटोकॅटॅलिस पद्धतीचा वापर करून प्रक्रिया केली जाते. यात ॲक्‍टीवेट कार्बनचा वापर करून युव्ही लाईट आणि कॅटॅलेस असलेल्या यंत्रणेत आठ ते दहा तास ठेवावे लागते. या प्रक्रियेनंतरही विषारी घटक शिल्लक राहतात. ही प्रक्रिया युव्ही लाईटव्दारे केली जाते. ही प्रक्रिया खर्चिक व वेळखाऊही आहे. हे पाणी तसेच नदी प्रवाहात सोडल्यास शेती तसेच प्राणी व मानवाच्या आरोग्यास अपायकारक ठरते. याला पर्याय शोधत प्रा. डॉ. गरडकर यांनी संशोधन केले. या संशोधनात त्यांनी एक किंवा दोन ऑक्‍साईड एकत्र करून रंगद्रव्ये असलेले मिश्रण सूर्यप्रकाशात अर्धा ते पाऊण तास ठेवल्यानंतर हे पाणी पूर्णतः शुद्ध करण्याची नवी पद्धत विकसित केली. त्यांच्या या संशोधनामुळे कमी खर्चात, कमी वेळात रंगद्रव्ये असलेले मिश्रण शुद्ध करता येणे सोपे झाले आहे.

डॉ. गरडकर आर. के. नगर परिसरात राहतात. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठात झाले. रसायनशास्त्र विषयातून त्यांनी पीएच.डी.ही संपादन केली. सध्या ते शिवाजी विद्यापीठातच इंडस्ट्रीअल केमेस्ट्री विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 

महाराष्ट्र ॲकॅडमीला सायन्सेस पुरस्कार
प्रा. डॉ. गरडकर यांना फेलो ऑफ महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ सायन्सेस हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. संशोधन क्षेत्रात प्रतिष्ठित मानला जाणारा हा पुरस्कार आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अमेरिकल केमिकल सोसायटी, इंडियन सोसायटी फॉर रेडिएसन अॅण्ड फोटोकेमेस्ट्री या संस्थांनी आजीव सदस्यपद बहाल केले आहे. तसेच, ते अप्लाइड फिजिकल सायन्स इंटरनॅशनल नॉलेज प्रे, केमिस्ट्री ॲण्ड अप्लाईड बायोकेमेस्ट्री, नॅनोसायन्स ॲण्ड टेक्‍नॉलॉजी या आंतरराष्ट्रीय जर्नल्सचे समीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com