esakal | कोरोनाची धास्ती घेतलेल्या परीक्षार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला  धरला जोर 

बोलून बातमी शोधा

postponed mpsc exam on april 11 student recruitment education marathi news

 11 एप्रिलची 'एमपीएससी'ची परीक्षा पुढे ढकला : विद्यार्थ्यांची विनंती

कोरोनाची धास्ती घेतलेल्या परीक्षार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला  धरला जोर 
sakal_logo
By
मतिन शेख

कोल्हापूर : राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) 11 एप्रिला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करीत आहेत.राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. पुण्यात तसेच कोल्हापुरात अभ्यासाला असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असून परीक्षा झाल्यास कोरोनाचा उद्रेक वाढेल ; तरी परीक्षा पुढे ढकलावी  अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून येत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य सरकारच्या सूचनेनुसार आयेगाने एमपीएससीची 14 मार्च 2021 रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होतो. या निर्णया विरोधात परिक्षार्थींनी रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन केले. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने आपला निर्णय बदलत 21 मार्चला परीक्षा घेण्याचे जाहीर केले. तसेच पुढील परीक्षा नियोजित वेळेत होतील असे स्पष्ट केले होते. 21 मार्चची राज्यसेवा पुर्व परीक्षा वेळेत झाली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने येत्या 11 एप्रिलला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थी सध्या करीत आहेत. 

हेही वाचा- दुबईत पार पडलेल्या पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल चॅम्पियन शिपमध्ये कोल्हापूरच्या आरती पाटीलला कास्य पदक

कोरोनाची धास्ती घेतलेल्या परीक्षार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला जोर लावला आहे.तर तब्बल दोन वर्षांनी ही परीक्षा होत असल्याने परीक्षा पुढे ढकलू नये असा ही परीक्षार्थ्यांचा एक मत प्रवाह दिसुन येत आहे.वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने अनेक निर्बंध घातले आहेत पण या परीक्षेच्या संदर्भात आयोग आणि शासन काय निर्यण घेईल याकडे परीक्षार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाचा धोका वाढला आहे.स्पर्धा परीक्षा करणारे बरेच मित्र बाधित आहेत.गेल्या परीक्षेवेळी परिस्थिती वेगळी होती आता अधिक संसर्गाची भिती असल्याने परीक्षा पुढे ढकलावी अशी आमची मागणी आहे.
- धनंजय बच्चे ( परीक्षार्थी )

जीवाचा विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.वेगवेगळी परीक्षा केंद्रे असल्याने परीक्षार्थ्यांना या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात प्रवास करावा लागणार आहे.यात संसर्गाचा धोका आहे.प्रामाणिक अभ्यास करणारे बरेच जण बाधित आहेत.
- तेजश्री गायकवाड ( परीक्षार्थी )

संपादन- अर्चना बनगे