खून झाल्यानंतर दीपक स्वतःच पहाटे पाच पाच वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आला. झोपेत असणाऱ्या ठाणे अंमलदाराला जागे करून खून केल्याची कबुली दिली.
इचलकरंजी : यंत्रमाग कामगाराने चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा कोयत्याने गळा चिरून खून (Murder Case) केला. मनीषा धावोत्रे (रा. स्वामी मळा परिसर) असे मृत पत्नीचे नाव आहे. खून केल्यानंतर पती दीपक धावोत्रे स्वतःहून पोलीस ठाण्यात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हजर झाल्यानंतर पोलिसांची झोप उडाली.