

Powerloom workers at textile units in Ichalkaranji await DA hike implementation.
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी येथील यंत्रमाग उद्योगातील कामगारांच्या २०१३ रोजी झालेल्या संयुक्त करारानुसार २०२५ साठी होणाऱ्या मजुरीवाढीअंतर्गत महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली आहे. या करारानुसार वाढीव महागाई भत्ता १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्यात येणार आहे. तो पीस रेटवर रूपांतरित करून प्रतिमीटर ६ पैसे इतका निश्चित केला आहे.