
कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची, तर सहपालकमंत्री म्हणून राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीने या पदासाठी आग्रही असलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना वाशिम जिल्ह्याचे; तर कोल्हापूरचे सुपुत्र आणि कोथरूडचे आमदार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सांगली जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे, उपमुख्यमंत्री अजित पवार बीड आणि पुण्याचे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई शहर अन् ठाण्याचे पालकमंत्री असतील. पालकमंत्रिपदे राखण्यातही भाजपने बाजी मारल्याचे दिसते. त्याखालोखाल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विविध जिल्ह्यांची मनसबदारी मिळाली आहे.