'सरकारमुळे आरक्षणासाठी मराठा समाजावर पुन्हा आंदोलनाची वेळ'

आंदोलनात ॲड. आंबेडकर यांनी सहभाग घेत मराठा आरक्षणाला पाठिंबा व्यक्त केला.
'सरकारमुळे आरक्षणासाठी मराठा समाजावर पुन्हा आंदोलनाची वेळ'
Updated on: 

कोल्हापूर : मराठा आरक्षण प्रश्नी (maratha reservation) सरकार कमी पडल्याने मराठा समाजावर पुन्हा आंदोलनाची वेळ आल्याची माहिती वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी पत्रकारांना दिली. सकल मराठा समाजातर्फे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (sambhaji raje) यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात मूक आंदोलन झाले. नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक परिसरात त्याचे आयोजन केले होते. त्या आंदोलनात ॲड. आंबेडकर यांनी सहभाग घेत मराठा आरक्षणाला पाठिंबा व्यक्त केला.

'सरकारमुळे आरक्षणासाठी मराठा समाजावर पुन्हा आंदोलनाची वेळ'
'एक मराठा लाख मराठा कोल्हापुरात पुन्हा एकदा एल्गार

ॲड. आंबेडकर म्हणाले, 'मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यात सरकार कमी पडले. त्याबाबत मी सरकारला दोष देतो. सरकारने योग्यरित्या बाजू मांडली असती तर मराठा समाजावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली नसती. मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा असून, समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही माझी भूमिका आहे.' तत्पूर्वी, ॲड. आंबेडकर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकास अभिवादन केले. भर पावसात आंदोलनात सहभागी होत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com