esakal | ...तर हसन मुश्रीफांचे घरी जाऊन अभिनंदन करू
sakal

बोलून बातमी शोधा

...तर हसन मुश्रीफांचे  घरी जाऊन अभिनंदन करू

...तर हसन मुश्रीफांचे घरी जाऊन अभिनंदन करू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी ‘आयजीएम’ (IGM Hospital) च्या आश्‍वासनासारखे आता यंत्रमाग कामगारांच्या स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापनेच्या आश्‍वासनात कमी पडू नये, इचलकरंजीला (Ichalkarnji) दिलेली आश्‍वासने पूर्ण होत नाहीत. दिलेल्या आश्‍वासनानुसार दोन महिन्यांत यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे. असे झाले तर आम्ही तुमच्या घरी येऊन तुमचे अभिनंदन करू, असा प्रतिटोला आमदार प्रकाश आवाडे (Prakash Aawade) यांनी लगावला.prakash-awade-igm-hospital-ichalkarnji-case-criticism-on-hasan-mushrif-political-kolhapur-news

इचलकरंजीत दोन दिवसांपूर्वी बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेच्या माध्यान्ह भोजनाचा प्रारंभ कामगार मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. त्यावेळी यंत्रमाग कामगारांच्या स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली. यावेळी आमदार आवाडे उपस्थित असते तर घोषणा ऐकून ते खूष झाले असते, असा टोला लगावत मुश्रीफ यांनी आवाडे यांच्यावर निशाणा साधला होता. याला आज आवाडे यांनी प्रत्युत्तर दिले. आवाडे म्हणाले, ‘‘कित्येक वर्षांपासून यंत्रमाग कामगारांच्या स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

हेही वाचा- Kolhapur Lockdown Update :दुकाने उघडण्याबाबत तूर्तास निर्बंध कायम; शहरी, ग्रामीणसाठी यापुढे एकच नियम

सध्या मंत्री मुश्रीफ हे कामगार खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी घोषणेप्रमाणे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ दोन महिन्यांत स्थापन करावे. दोन महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीने मंत्री मुश्रीफ शहरात आले आणि आयजीएमला बडे आश्‍वासन देऊन गेले. मात्र प्रत्यक्षात कोरोनाची दुसरी लाट संपत आली तरी आश्‍वासनानुसार आयजीएममध्ये काहीच दिसत नाही. कोणत्याही द्वेषाच्या भावनेतून टीका करत नसून नागरिकांच्या भावना मी मांडत असतो.’’

loading image