दुर्दैव : पंधरा रुग्णालये फिरूनही  उपचार नाहीत ; अखेर गाढले मृत्यूने....

Pramilaraje Hospital in kolhapur coronavirus third case in the kolhapur city covid19
Pramilaraje Hospital in kolhapur coronavirus third case in the kolhapur city covid19

कोल्हापूर : धापेचा त्रास सुरू झालेल्या रंकाळावेश तालीम मंडळाचे माजी अध्यक्ष रंगराव रामचंद्र चव्हाण (वय ६१) यांच्यावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासह शहरातील पंधरा रुग्णालये फिरूनही उपचार न मिळाल्याने आज सकाळी त्यांचा धक्‍क्‍याने मृत्यू झाला. शहरातील हा दुसरा संतापजनक प्रकार घडला आहे. उपचारास नकार दिल्याने एका खासगी रुग्णालयावर लाथा घालून काचेचा दरवाजा फोडण्याचा प्रकारही घडला. या प्रकाराने शहरातील चिंताजनक परिस्थितीचा आणखी एक अनुभव समोर आला आहे. यातून कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 


काल (२३) रात्रीच गांधीनगरच्या एका रुग्णाला सीपीआरमध्ये दाखल करून घेतल्याने त्यांचा सीपीआरच्या दारातच मृत्यू झाला. त्याचप्रमाणे रंकाळावेश परिसरातील या वृद्धाला धापेचा त्रास होऊ लागल्याने पहिल्यांदा सीपीआरमध्ये आणले; पण खाट उपलब्ध नसल्याचे कारण सांगून त्यांना दाखल करून घेतले नाही. त्यानंतर शहरातील सर्व खासगी रुग्णालयात नातेवाईकांनी त्यांना नेले; पण कोणीही दाखल करून घेण्याची तयारी दर्शवली नाही. एका रुग्णालयात तर ऑक्‍सिजन नसल्याचे कारण सांगून त्यांना माघारी घालवण्यात आले. त्याच रुग्णालयात या रुग्णाच्या मुलाचा आणि डॉक्‍टरांचा वाद झाला. त्यातून कुणीतरी रुग्णालयाचा दरवाजा लाथ घालून फोडला. शहरातील जवळपास पंधरा रुग्णालयात या नातेवाईकांनी रुग्णाला घेऊन धडका मारल्या; पण कोणीही त्यांना दाखल करून घेतले नाही. 


शेवटी त्यांना डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये नेले. तेथेही जागा नसल्याने या रुग्णालयात त्यांना स्वॅब घेऊन घरी सोडण्यात आले. तेथून सर्व प्रकिया पूर्ण होऊन घरी जायला रात्रीचे तीन वाजले. आज सकाळी श्री. चव्हाण यांचे जावई व नगरसेवक विजय खाडे-पाटील यांनी प्रयत्न करून काही खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी सकाळी पावणेनऊच्या सुमारास त्यांना वाहनातून रुग्णालयाकडे नेले जात होते, त्याचवेळी त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा निरोप फोनवर आला. हे समजताच श्री. चव्हाण यांना धक्का बसला. त्यातच त्यांनी वाहनातच अखेरचा श्‍वास घेतला. या घटनेने या परिसरात संतपाची लाट उसळली आहे. 


प्रशासनाचे अपयश
ज्येष्ठ नागरिकांना सरकारी आणि खासगी रुग्णालयातही उपचार मिळत नसतील, तर हे गंभीर आहे. एका खासगी रुग्णालयात नुसता ऑक्‍सिजनचा पुरवठा श्री. चव्हाण यांना झाला असता तरी त्यांचा जीव वाचला असता; पण त्यांनी आतही घेतले नाही. हे प्रशासन, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींचे अपयश असून अशीच परिस्थिती राहिल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनण्याची शक्‍यता आहे. 
विजयसिंह खाडे-पाटील, नगरसेवक व (कै.) चव्हाण यांचे जावई

महिलेवरही अशीच वेळ
नाळे कॉलनीतील एका महिलेवर आज अशीच वेळ आली. त्यांनाही अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, सलग १५ रुग्णालये फिरूनही त्यांना उपचारासाठी कुणीही दाखल करून घेतले नाही. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

 संपादन - अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com