esakal | श्री अंबाबाईच्या प्रसाद; साड्या खरेदी-विक्रीला प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

श्री अंबाबाईच्या प्रसाद; साड्या खरेदी-विक्रीला प्रतिसाद

श्री अंबाबाईच्या प्रसाद; साड्या खरेदी-विक्रीला प्रतिसाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने आजपासून करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांकडून अर्पण केलेल्या प्रसाद साड्यांच्या विक्रीला प्रारंभ झाला. टेंबलाईवाडी येथील देवस्थान समितीच्या हॉलमध्ये साडी विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाला प्रारंभ झाला.

हेही वाचा: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जावळीत बॉम्ब शोधक पथकाची तपासणी

दरम्यान, गौरी पुजनाच्या पार्श्वभूमीवर देवी प्रसाद साडी विक्रीस भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र, कोरोना नियमांचे पालन करत आणि कुपन असेल तरच साडी देण्याचे नियोजन समितीने केले आहे. धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांच्या हस्ते प्रसाद साडी कुपनाचे वाटप झाले. सहाय्यक धर्मादाय आयुक्त रूपाली कोरे यांच्या हस्ते साडी विक्रीला प्रारंभ झाला.

यावेळी व्यवस्थापक धनाजी जाधव, उप-अभियंता सुयश पाटील, लेखापाल धैर्यशील तिवले, मिलिंद घेवारी आदी उपस्थित होते. दरम्यान, सकाळी आठ ते अकरा या वेळेत शंभर आणि दुपारी दोन ते पाच या वेळेत शंभर अशी एकूण दोनशे कुपन्स रोज दिली जात असून सकाळी प्रथम येणाऱ्यांना प्रथम या तत्वावर साडीची विक्री केली जात आहे.

loading image
go to top