कोल्हापूर : मॉन्सनपूर्व पाऊस (Pre-monsoon Rain) जास्त आहे. याचा आठ दिवस आधी अंदाज व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचा संप मिटवून शेतीच्या नुसकसानीचे पंचनामे सरकारने करणे आवश्यक होते; पण असे झाले नाही. सरकार सत्तेच्या वाटपात गुंतले आहे. कृषिमंत्री (Agriculture Minister) शेतीच्या बांधावर गेलेले पाहिले नाही, अशी टिका काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.