Kolhapur : महिलेचा गर्भपात करताना मृत्यू; जयसिंगपुरात गर्भलिंग निदान, गर्भपाताचे रॅकेट? शहरात उडाली खळबळ

जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान केलेल्या महिलेचा महालिंगपूरम (ता. बागलकोट) येथे गर्भपाताच्या शस्त्रक्रिये दरम्यान मृत्यू झाला आहे.
Pregnancy and Abortion Racket
Pregnancy and Abortion Racketesakal
Updated on
Summary

जयसिंगपूर हे शिरोळ तालुक्यातील वैद्यकीयदृष्टया अद्ययावत समजले जाते. तालुक्यासह कर्नाटक सीमाभागातून रुग्ण उपचारासाठी शहरात येत असतात.

जयसिंगपूर : हातकणंगले तालुक्यातील (Hatkanangle) एका गावातील महिलेचा गर्भपातावेळी (Miscarriage) झालेल्या मृत्यूनंतर जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेट (Pregnancy and Abortion Racket) समोर आले आहे. जयसिंगपूर येथे ज्या सेंटरमध्ये गर्भलिंग निदान झाले आहे. त्या सेंटरपर्यत पोलिस तपास पोहचणार का, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. दरम्यान जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

Pregnancy and Abortion Racket
Radhanagari Crime : पेरणीच्या वादातून मुलाने आईच्या डोक्यात खोरे मारून केला खून; घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता

जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान केलेल्या महिलेचा महालिंगपूरम (ता. बागलकोट) येथे गर्भपाताच्या शस्त्रक्रिये दरम्यान मृत्यू झाला आहे. या सर्व धक्कादायक प्रकारानंतर जयसिंगपूरमध्ये (Jaysingpur) सुरू असलेले गर्भलिंग निदान याचा पर्दाफाश झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जयसिंगपूर शहरात गर्भलिंग निदान केले जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. यासाठी लाखो रूपये उकळले जात आहे.

यापूर्वी गारगोटी, करवीर, शाहूवाडी या ठिकाणी गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्‍या रॅकेटचे सर्व म्होरके जेरबंद झाले आहेत. असे असले तरी याचे जाळे कर्नाटकच्या सीमाभागात पोहचले आहे. जयसिंगपूर शहरात दहा तर शिरोळ शहरात चार मान्यताप्राप्त सोनोग्राफी केंद्रे आहेत.

Pregnancy and Abortion Racket
धक्कादायक! हातकणंगलेतील 32 वर्षीय महिलेचा गर्भपात करताना मृत्यू; दाखल्यासाठी सांगलीत मृतदेह फिरवला अन्...

जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान केलेल्या हातकणंगले तालुक्यातील एका गावातील या महिलेने कोणत्या ठिकाणी गर्भलिंग निदान केले आहे याचे मात्र ठिकाण अद्याप समजले नाही. या विवाहितेच्या मृत्यूनंतर जयसिंगपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सीमाभागातून रुग्ण उपचारासाठी शहरात

जयसिंगपूर हे शिरोळ तालुक्यातील वैद्यकीयदृष्टया अद्ययावत समजले जाते. तालुक्यासह कर्नाटक सीमाभागातून रुग्ण उपचारासाठी शहरात येत असतात. याचा फायदा घेत शहरातील काहींनी गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्याचा सपाटा बिनधास्तपणे सुरू ठेवला आहे. गर्भलिंग निदान करण्यासाठी ८० हजार ते १ लाख व गर्भपात करण्यासाठी २५ ते ३० हजार रुपये उकळले जात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Police Tighten Noose Around Gender Testing Racket; More Arrests Likely After Fresh Seizure
Pune Doctor Among Latest Arrests in Widening Illegal Foetal Sex Determination Network
Kedgaon Sex Determination Case
Pune Link Emerges in Foetal Sex Determination Scam; Probe Deepens
Marathi News Esakal
www.esakal.com