तब्बल अकरा वेळा स्वॅब घेतला, पण ती गर्भवती अजूनही कोरोना पॉजिटीव्हच...

 pregnant women swab rest eleven times but she was still corona positive
pregnant women swab rest eleven times but she was still corona positive
Updated on

बेळगाव - बेळगावातील कोविड कक्षात उपचार घेणाऱ्या तीन गर्भवती महिलांपैकी एका महिलेचा तब्बल अकरा वेळा स्वॅब घेण्यात आला आहे. उर्वरीत दोन महिलांचा नऊ वेळा स्वॅब घेण्यात आला आहे अशी माहिती आरोग्य विभागातून मिळाली आहे. या तिन्ही महिलांच्या स्वॅबचा अहवाल केवळ एकदाच निगेटीव्ह आला आहे. त्याआधी व नंतरही अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने त्यांना अद्याप कोविड कक्षातून मुक्त केलेले नाही. त्या महिलांना त्यांच्या घरी पाठवून तेथे आयसोलेशन करण्याचा विचार आरोग्य विभागाने सुरू केला होता, पण त्याबाबत अंतीम निर्णय झालेला नाही. कोविडबाबत राज्यशासनाकडून नवी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जाणार आहे. त्यानंतरच त्या महिलांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. पण तोवर त्यांना कोविड कक्षात ठेवूनच त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.

या महिलांना दाखल करून 40 दिवसांचा कालावधी लोटला

कोरोनाबाधीतांपैकी तब्बल 284 जण बरे होवून घरी गेले आहेत. पण तीन गर्भवती महिला मात्र अजूनही कोरोनामुक्त झालेल्या नाहीत. या महिलांच्या कुटुंबातील सदस्य खूप तणावाखाली आहेत. पण आरोग्य विभागाचाही नाईलाज झाला आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी यासंदर्भात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे, पण जोवर सलग दोन अहवाल निगेटीव्ह येणार नाहीत, तोवर त्यांना घरी पाठविता येणार नाही असे आरोग्य विभागाने सांगीतले आहे. या तिन्ही महिलांना कोविड कक्षात दाखल करून 40 दिवसांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंताही वाढली आहे. कोरोनाबाधीत व्यक्ती किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा स्वॅब घेतला जातो. सलग दोन अहवाल निगेटीव्ह आले की ते कोरोनामुक्त झाले असे जाहीर केले जाते. पण या तीन महिलांपैकी एका महिलेचा स्वॅब तब्बल अकरावेळा घेण्यात आला आहे. अन्य दोन महिलांचा स्वॅब नऊवेळा घेण्यात आला आहे.

बेळगाव जिल्ह्यात जेवढे कोरोनाबाधीत सापडले आहेत, त्यापैकी कोणालाही अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले नाही किंवा व्हेंटीलेटर लावण्याची वेळ आरोग्य विभागावर आली नाही. या तीन महिलांबाबतही असे काही करावे लागलेले नाही. पण त्या कोरोनामुक्त का होत नाहीत? या प्रश्‍नाचे ठोस उत्तर आरोग्य विभागाकडे नाही. गर्भवती महिला, लहान मुले, जेष्ठ नागरीक यांना कोरोनाची लागण लगेच होते. त्यामुळे त्यांना खबरदारी घेण्यास सांगीतले जाते. या गर्भवती महिलांची प्रसूती महिनाभरात होणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला त्यांच्याबाबत ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com