सध्या निवडणूक प्राधिकरणाला गुगलवरून प्रत्येक संस्थेचे अपडेट मिळते. ज्या संस्थेच्या याद्या तयार झालेल्या नाहीत, त्यांची नावे थेट जिल्हा दुग्ध विभागांना पाठविली जात आहेत.
कोल्हापूर : जिल्ह्यातील सातशे सहकारी दूध संस्थांच्या (Sahakari Dudh Sanstha Election) निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. काही संस्थांकडून मतदार याद्या तयार करण्यासाठी दिरंगाई होत आहे, अशा दूध संस्थांना थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यांची संस्था अवसायनात काढली जाणार आहे.