दीड महिन्यापासून परिसरात वाघांचा वावर सुरू झाल्याने खबरदारी म्हणून वनविभागाने या परिसरात जाण्यास भाविक व ग्रामस्थांना प्रतिबंध केला आहे.
आजरा : आजरा तालुक्याच्या जंगल परिसरात तीन वाघांचा वावर आहे. वाघांचे दर्शन स्थानिक रहिवाशांना झाले आहे. दरम्यान, चाळोबा जंगल (Chaloba Forest) परिसरातही वाघांचा वावर आहे. त्यामुळे या परिसरात जाण्यास वनविभागाकडून (Forest Department Ajra) प्रतिबंध केला आहे. याबाबतच्या सक्त सूचनाही दिल्या असून, जंगलामध्ये जाणाऱ्या रस्त्यावरील प्रवेशद्वारही बंद केले आहे.