Kolhapur : राष्ट्रपती रामनाथ कोविंद ७ डिसेंबरला दुर्गराज रायगडावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ramnath-kovind
राष्ट्रपती कोविंद ७ डिसेंबरला दुर्गराज रायगडावर

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ७ डिसेंबरला दुर्गराज रायगडावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद ७ डिसेंबरला दुर्गराज रायगडला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहेत. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या निमंत्रणानुसार ते गडावर येत आहेत. दरम्यान, राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग रायगडावर १९८५ ला होते. त्यानंतर ३५ वर्षांनंतर राष्ट्रपती गडाला भेट देत असल्याने शिवप्रेमींत कार्यक्रमाची उत्सुकता आहे. संभाजीराजे यांनी दिल्ली येथे आयोजित शिवजयंती सोहळ्यात राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते.

ते निमंत्रण स्वीकारून राष्ट्रपती कोविंद रायगडला भेट देतील. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी रायगड जिल्हा प्रशासन व रायगड विकास प्राधिकरणातर्फे सुरु झाली आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या सहकार्याने कार्यक्रम होईल. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी १९८० ला शिवछत्रपतींच्या जन्म शताब्दी सोहळ्यानिमित्त रायगडावर आल्या होत्या. त्यांनी सिंहासनाच्या जागेवर मेघडंबरी उभारण्याची सूचना केली होती. मेघडंबरीचे काम पूर्ण झाल्यानंतर १९८५ ला राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते मेघडंबरीचे अनावरण झाले. या घटनेला पस्तीस वर्षे झाली आहेत. आता राष्ट्रपती कोविंद गडावर येणार आहेत.

loading image
go to top