पोटॅशचा दर ६८० रुपयांनी वाढणार

शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; अवकाळीनंतर पुन्हा दरवाढीचा तडाखा
पोटॅशचा दर ६८० रुपयांनी वाढणार
पोटॅशचा दर ६८० रुपयांनी वाढणारsakal

कुडित्रे : रब्बीच्या अखेरीस पुन्हा रासायनिक खतांची दरवाढ होणार आहे. पोटॅश बॅगचा दर ६८० रुपयांनी वाढणार असल्याच्या सूचना कंपन्यांनी होलसेल दुकानदारांना दिल्या आहेत. वाढीव दराचे खतही बाजारात आले आहे. यामुळे अवकाळीमुळे अडचणीत शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. खत दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी होत आहे.जिल्ह्यात रब्बीचे २२ हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे. एक ऑक्टोबरपासून हंगाम सुरू झाला आहे. हंगामासाठी १ लाख ५४ हजार टन खताची मंजुरी मिळाली होती. रब्बी हंगाम ७० टक्के पूर्ण झाला आहे. १६ हजार हेक्‍टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

यंदा नदीकाठची पिके गेली आहेत. या महिन्यातील अवकाळी पावसाने रब्बी हंगाम अडचणीत असताना खत दरवाढीची टांगती तलवार शेतकऱ्यांवर आहे. खरिपात मोदी सरकारने खत दरवाढ झाल्यानंतर पुन्हा मागे घेतली होती. सध्या युरियाचे दर स्थिर आहे, मात्र इफ्को १०:२६:२६ खताचा तुटवडा आहे. हंगामी लागणीला १०:२६:२६ खताची मागणी होत आहे.

पोटॅशचा दर ६८० रुपयांनी वाढणार
भाजपचे शक्तिप्रदर्शन, शिवसेना अस्वस्थ!

१०:२६:२६ चा दर ११८० रुपये होता. आता तो २०० रुपयांनी वाढणार आहे. पोटॅशचा दर १०४० वरून १७२० रुपये झाला आहे. पोटॅशमध्ये एकदम ६८० रुपयांची वाढ झाल्याची माहिती कृषी संघ सूत्रांनी दिली आहे. केंद्र शासनाने वाढीव अनुदान दिले नाही तर वाढ होईल. कंपन्या शासनाच्या निर्णयाची वाट बघत आहेत, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली.

खताचे मागील दर व संभाव्य दरवाढ अशी

  • पोटॅश जुना दर १०४० वाढ ६८०

  • इफ्‍को १०:२६:२६ जुना दर ११८० वाढ २००

  • १२:३२:१६ जुना दर १२५० वाढ २००

  • १५:१५:१५ जुना दर ११८० वाढ २००

  • १६:१६:१६ जुना दर १२५० वाढ १५०

"शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. खतांची दरवाढ झाली आहे, असे दुकानदार सांगत आहेत. केंद्र शासनाने खतांची दरवाढ मागे घ्यावी, शेती करायची का नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे."

- सागर इंगवले, शेतकरी दोनवडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com