esakal | गडहिंग्लज व राधानगरीसाठी निधी मंजूर; 13 गावांचा समावेश

बोलून बातमी शोधा

Prime Minister Village Road Scheme of the Central Government Funding approved olhapur letest news

दुर्गम व डोंगराळ भागातील रस्ते मंजूर झाल्याने येथील वाहतुक व्यवस्था सुरळीत होणार असल्याचे म्हटले आहे.

गडहिंग्लज व राधानगरीसाठी निधी मंजूर; 13 गावांचा समावेश

sakal_logo
By
संदिप खांडेकर

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील तिसऱ्या टप्याअंतर्गत कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील गडहिंग्लज व राधानगरी तालुक्यातील एकूण चार कामांकरीता ७ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 

दुर्गम व डोंगराळ भागातील रस्ते मंजूर झाल्याने येथील वाहतुक व्यवस्था सुरळीत होणार असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान ग्रामसडक योजना  शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना असून ही योजना राज्यात २००० पासून राबविण्यात येत आहे.  

योजनेचा तिसरा टप्पा कार्यान्वित असून यापैकी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी - तनवाडी - हणमंतवाडी - चिंचेवाडी रस्त्याकरीता १ कोटी ३५ लाख, प्रमुख जिल्हा मार्ग ५६ जरळी ते शिंदेवाडी - खमलेहत्ती - भडगांव प्रमुख जिल्हा मार्ग ५७ रस्त्याकरीता १ कोटी ८९ लाख, राज्य मार्ग २०१ - नरेवाडी ते माणवाड - तेरणी रस्त्याकरीता २ कोटी ५२ लाख असे गडहिंग्लज तालुक्याकरीता तीन कामांकरीता एकूण ५ कोटी ७६, तर राधानगरी तालुक्यातील घोटवडे - राशिवडे (करवीर तालुका हद्द) रस्त्याकरीता १ कोटी ७६ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

संपादन- अर्चना बनगे