
Weather Update : दाजीपूर अभयारण्य परिसरातील जंगलात धुवाधार पाऊस कोसळतो. त्यामुळे जंगलात पाणीच पाणी होते. पुढे हेच पाणी राधानगरी धरणात जमा होते. मात्र, जंगलात पडणारा हा पाऊस मोजण्याची स्वयंचलित यंत्रणा खासगी कंपनीचा करार संपल्याने गेल्या आठवड्यापासून ठप्प झाली आहे. त्यामुळे जंगलात किती पाऊस पडतो हे समजत नसल्याने राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या आवकेचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.