वारंवार नियम मोडल्यास व्यावसायिकांचा परवाना रद्द

Professional's license revoked in case of repeated breaches
Professional's license revoked in case of repeated breaches

कोल्हापूर ः कोरोनाशी लढताना नियमाचे पालन करण्यात हयगय करणाऱ्या व्यावसायिक, विविध संस्था, हॉटेल्स, मंगल कार्यालय यासह गर्दीची ठिकाणे आहेत, तेथे महापलिका प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार नियम मोडणाऱ्यांचे वेळप्रसंगी व्यवसाय परवाना कांही दिवसासाठी रद्द करणे आणि फौजदारीचीही कारवाई होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी,व्यावसायिकांनी नियमाचे पालन तंतोतत करावे,असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत केले. 
यापुर्वी मास्क न वापरणाऱ्यांवर शंभर रुपयांची दंडात्मक कारवाई केली जात होती. त्यामध्ये दुप्पट वाढ केली आहे. याशिवाय वांरवार नियम तोडणाऱ्यांना जादाच्या दंडाची तरतूद आहे. दुकादार, मंगल कार्यालय, हॉटेल्स व मोठा स्टाफ असणाऱ्या आस्थापनांनी जर नियमाचे उल्लंघन केले. यापुर्वी केवळ हजार रुपयांची तरतूद केली होती. आता यामध्ये दोन हजार रुपये दंड केला आहे. पहिल्यांदा नियम मोडला तर दंड, दुसऱ्यांदा मोडला तर एक दिवसासाठी व्यवसाय बंद, तिसऱ्यांदा नियमाचे उल्लघंन झाले तर पंधरा दिवसासाठी किंवा महिन्याभरासाठीही व्यवसाय परवाना रद्द केला जाणार आहे. या पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई,उपायुक्त निखिल मोरे, आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ उपस्थित होते. 

आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक 
कांही रुग्णांची एचआरसीटी करुन त्यांच्यावर उपचार केले जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे ज्या रुग्णांची एचआरसीटी केली आहे. त्यांची आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक आहे. यासंदर्भात महापालिका आरोग्य विभागाने डॉ. रमेश जाधव आणि डॉ. अमोल माने यांची नोडल ऑफसिर म्हणून नियुक्ती केली आहे. खासगी रुग्णालयांनी अथवा निदान केंद्रानी महापालिकेला यासंदर्भातील माहिती देणे अपेक्षित आहे.माहिती देण्यास टाळाटाळ केली तर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. 

समारंभातून बाधित होण्याचे प्रमाण जास्त 
डॉ. बलकवडे म्हणाल्या, "" सध्या विवाहासह विविध सार्वत्रिक कार्यक्रमाला उपस्थिती लावणाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अशा ठिकाणी नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याने येथे नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com