Crime News : प्रॉपर्टी एजंट प्रकरणात नवे वळण; दोघांना अटक, सराफ अद्याप फरार, पोलिस तपास तीव्र

Property Agent : प्रॉपर्टी एजंट आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून या प्रकरणात आणखी एका सराफाचा शोध सुरू आहे. अटकेत असलेल्या संशयितांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
criminal case

criminal case

sakal

Updated on

कोल्हापूर : प्लॉट खरेदी व्यवहारात आलेल्या आर्थिक अडचणीतून प्रॉपर्टी एजंट धनंजय कापसे (वय ५५) यांना मारहाण, वारंवार त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल झाला होता. यातील संशयित अभिजित आनंदराव शेळके (३५, रा. सर्व्हेश पार्क, फुलेवाडी) व छाया सदाशिव राऊत (५८, रा. अयोध्या कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांना आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com