कर्नाटकात येण्यास कोरोना चाचणी आवश्यक; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्नाटकात येण्यास कोरोना चाचणी आवश्यक; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

बेळगाव - वेंगुर्ला मार्गावर शिनोळी (ता. चंदगड) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

कर्नाटकात येण्यास कोरोना चाचणी आवश्यक; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

चंदगड : कर्नाटक शासनाने महाराष्ट्रातील (maharashtra) नागरिकांना बेळगाव शहरात येण्यास रोखण्यासाठी कोरोना चाचणी सर्टिफिकेट (covid-19 testing) आवश्यक केले आहे. यावर चंदगड तालुक्यातील नागरिकांनी आज आक्षेप घेतला. बेळगाव - वेंगुर्ला (belgaum-vengurla) मार्गावर शिनोळी (ता. चंदगड) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बाची (ता. बेळगाव) येथे उभारलेले पोलिस बॅरिकेट्स हटवावे अशी मागणी करण्यात आली. बेळगावचे तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा: सावधान! 'त्या' 50 गावांत पुन्हा दरडी कोसळण्याचा धोका

चंदगड तालुक्याचे (chandagad) बेळगाव शहराशी अनेक वर्षांपासूनचे नाते आहे. कौटुंबिक नातेसंबंध, आजारपण, शेत मालाची विक्री यासाठी बेळगाव शहराचा आधार घेतला जातो. शहरातील अनेक व्यवसाय केवळ चंदगड, आजरा, गडहिंग्लज विभागातील नागरिकांवर आधारले आहेत. असे असताना या विभागातील नागरिकांना कोरोना चाचणीची सक्ती का केली जाते अशी विचारणा करण्यात आली. यावळी ही अट रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली.

हेही वाचा: मुंबईसह देशातील 12 शहरे 2100 पर्यंत पाण्याखाली जातील; नासाचा इशारा

सणसमारंभांच्या दिवशी खरेदी, रुग्णालयात जाण्यासाठी परवानगी द्यावी. बाची येथे कर्नाटक शासनाने लावलेल्या बॅरिकेट्स बाजुला करावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिनोळी बुद्रुकचे सरपंच नितीन पाटील, उप सरपंच बंडु गुडेकर, प्रताप सुर्यवंशी ,  केतन खांडेकर, भैरू खांडेकर, डॉ. एन टी मुरकुटे, अमृत जत्ती, नारायण तातोबा पाटिल, राजु खांडेकर,अर्जुन पाटिल, विनोद पाटिल, प्रविण पाटील, नामदेव सुतार, विशाल सावी, युवराज पाटिल, राजू मेणसे, राजू किटवाडकर, अजित खांडेकर, प्रितम पाटील, शिवराज जत्ती उपस्थित होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :belgaum
loading image
go to top