esakal | खुली नाट्यगृहे हाच आमचा ऑक्सिजन...!
sakal

बोलून बातमी शोधा

खुली नाट्यगृहे हाच आमचा ऑक्सिजन...!

खुली नाट्यगृहे हाच आमचा ऑक्सिजन...!

sakal_logo
By
- संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : कोरोनाच्या (covid-19) पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून नाट्यगृहे बंद आहेत. यामुळे रंगकर्मींवर आर्थिक संकट आले आहे. फक्त पोटापाण्यासाठीच नाहीत तर औषधाच्या गरजाही रंगकर्मींना (theaters actors) भागवता येत नाहीत. आमच्या गरजा भागवणारी रंगभूमी, सर्व नाट्यगृहे आता लवकरात लवकर सुरु करावीत, अशी मागणी स्थानिक रंगकर्मींनी शासनाकडे केली आहे. मागणीचे निवेदन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे देण्यात आले. (kolhpaur update)

संगीतसूर्य केशवराव नाट्यगृहासमोर स्थानिक रंगकर्मींनी एकत्र येऊन मूक आंदोलन केले. नटराजाच्या मूर्तीचे पूजन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. कोल्हापुरातील नाट्यपरिषदे बरोबरच अनेक मान्यवर नाट्यसंस्थां, नृत्यसंस्थांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. सर्वच कलाकारांनी 'खुली नाट्यगृहे हाच आमचा ऑक्सिजन' अशा आशयाचे फलक घेऊन आंदोलनात सहभाग घेतला.

हेही वाचा: रानभाज्या खा अन् रोगप्रतिकार शक्ती वाढवा...

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाने गेल्या दीड वर्षांपासून राज्यासह जिल्ह्यातील सर्व व्यापार, उद्योगधंदे व्यवसाय बंद होते. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान होऊ लागल्याने राज्य सरकारने जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करुन दिलसा दिला आहे, पण या संकटात कलाकार मात्र दुर्लक्षित राहिला आहे. सरकारने 56 हजार कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपये प्रमाणे मदत जाहीर केली आहे. पण ही मदत अत्यंत तोकडी आहे.

नाट्यगृहे बंद असल्याने कलाकारांना जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळावी आणि नाट्यगृहे लवकरात लवकर सुरु व्हावीत. कोरोनाचे सर्व नियम आणि अटी पाळून नाट्यगृहात कार्यक्रम सादर केले जातील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

हेही वाचा: व्यवसायाच्या आमिषाने 6 लाखाला गंडा; दोघांची फसवणूक

या आंदोलनात कोल्हापूर नाट्यपरिषदेचे आनंद कुलकर्णी, शशिकांत चौधरी, शिवकुमार हिरेमठ, मकरंद लिंगनूरकर, राहुल राजशेखर, सागर बगाडे, संग्राम भालकर, किर्तीकुमार पाटील, ऋषिकेश पिसे, ज्योति कळके, सागर अध्यापक, अवधूत जोशी, समीर भोरे, विलास पाटील, राज पाटील, प्रसाद जमदग्नी, महेश सोनुले, सीमा मकोटे, स्नेशहल संकपाळ, सुनील घोरपडे, किरणसिंह चव्हाण यांच्यासह अनेक रंगकर्मी, नृत्यकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

loading image
go to top