
कोल्हापूर : पशुगणनेचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करा. प्राथमिक आरोग्य केंद्रात दर्जेदार सुविधा द्या, कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांचा शुक्रवारपर्यंत अहवाल द्या, अशा सूचना देऊन संस्थात्मक प्रसूतीबाबत समाधानकारक काम होत नसल्याची नाराजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी व्यक्त केली.