Teacher Constituency Records 88.62% Polling While Graduate Constituency Sees 63.83% Turnout in Kolhapur
esakal
कोल्हापूर: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानावेळी आज शहरासह जिल्ह्यात चुरस पाहायला मिळाली. दोन्ही मतदारसंघाच्या मिळून २८२ मतदान केंद्रांवर सकाळपासूनच पदवीधर व शिक्षक मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसल्या. सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत ‘पदवीधर’मध्ये सुमारे ६३.८३ टक्के व ‘शिक्षक’मध्ये ८८.६२ टक्के मतदान होऊन उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. आता पुणे येथे मंगळवारी (ता. २७) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा आहेत.