

Pune Kolhapur road blockage
esakal
Kolhapur Highway Accident News : पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील येलूर (जि. सांगली) येथे मालवाहू ट्रक अचानक उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या अपघातात जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही; मात्र एकेरी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.