कोल्हापूर : कुंडमळा (ता. मावळ, जि. पुणे) येथील इंद्रायणी नदीवरील (Indrayani River) साकव कोसळून झालेल्या (Pune Bridge Collapse) दुर्घटनेत उजळाईवाडी (ता. करवीर) येथील मूळ रहिवासी व सध्या पुणे येथे आयटी कंपनीत काम करणारे तरुण अभियंते रोहित सुधीर माने (वय ३०, रा. गणेश कॉलनी, उजळाईवाडी, सध्या रा. प्रेमलोक पार्क, चिंचवड) व त्यांचा पाच वर्षांचा मुलगा विहान यांचा मृत्यू झाला आहे, तर पत्नी शमिका (वय २८) या जखमी झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.