Teachers Constituency Election : काँग्रेससमोर जागा राखण्याचे आव्हान; महायुतीत इच्छुकांच्या भाऊगर्दीने चढाओढ

Pune Teachers Constituency, Mahayuti Challenge पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर पुन्हा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. महायुतीतील अनेक इच्छुकांमुळे उमेदवारीवरून चढाओढीची चर्चा सुरू आहे.
Congress Party

Congress Party

sakal

Updated on

कोल्हापूर,: आतापर्यंतच्या निवडणुकीत वर्चस्व राहिलेल्या आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना त्या जोरावर जिंकलेली पुणे शिक्षक विधान परिषदेची जागा राखण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर आहे. काँग्रेसकडून कोल्हापूरचे प्रा. जयंत आसगावकर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. पण, महायुतीकडूनही या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असून, इच्छुकांच्या भाऊगर्दीने महायुतीतच मोठी चढाओढ होण्याची शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील हे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या जोडीला राष्ट्रवादीकडून मंत्री हसन मुश्रीफ यांची साथ होती. या मतदारसंघातून जिल्ह्यातील इच्छुकांना एकत्र आणून त्यांची मोट बांधण्यात आमदार पाटील यशस्वी झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com