मास्क नाही तर दंड भरा ; इचलकरंजीत कारवाई सुरु

corona ichalkaranji
corona ichalkaranji
Updated on: 

इचलकरंजी - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे प्रशासनाने बंधनकारक केले आहे. त्यानंतरही अनेक नागरिक मास्क न वापरता धोकादायकपणे वावरत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पालिका प्रशासनाने मास्क न वापरणार्‍या नागरिकांवर कालपासून दंडात्मक कारवाईस सुरुवात केली. काल एकूण 34 नागरिकांवर ही कारवाई करण्यात आली. यातून प्रत्येकी 100 रुपये या प्रमाणे 3400 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.

सध्या कोरोनाचा संसर्ग धोकादायक बनत चालला आहे. त्याला रोखण्यासाठी उपाय योजना हाच मोठे साधन आहे. त्यामध्ये मास्क वापरणे सर्वांना सक्तीचे करण्यात आले आहे. माक्स न वापरल्यास जिल्हा प्रशासनाने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. यापूर्वी अनेक पालिका, महापालिका क्षेत्रात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विविध व्यक्ती, संस्थांनी हजारो मास्क नागरिकांना मोफत वाटले आहेत.मात्र सकाळी शिथीलतेच्या काळात अनेक नागरिक किराणा व दुध खरेदीसाठी बाहेर पडत असतांना त्यातील अनेकजण मास्क वापरत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानुसार काल स्वच्छता निरिक्षकांच्या माध्यमातून मास्क न वापरणार्‍या नागरिकांना 100 रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे.

झेंडा चौक येथे स्वच्छता निरिक्षक संपत चव्हाण यांच्या पथकाने 16 नागरिकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येक 100 रुपये प्रमाणे 1600 रुपये दंड वसूल केला. विशेष म्हणजे कचरा वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर - ट्रॉली चालकालाही दंड करण्यात आला. कोल्हापूर नाका परिसरात स्वच्छता निरिक्षक रफिक पेंढारी यांच्य पथकांने 18 जणांवर कारवाई करीत 1800 रुपये दंड वसूल केला. यापुढेही ही कारवाई सुरुच राहणार आहे.

सुज्ञ नागरिकांचा अडाणीपणा

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. असे असतांना सुज्ञ नागरिकच अडाण्यासारखे वागत आहे. मास्क न घालता अगदी मॉर्निंग व इव्हनींग वॉक करीत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Viral Audio Allegations Against Ravikiran Ingawale
Kolhapur District Bank Election 2026 Draft Voter List To Be Published Soon Polling Likely In December
Punyashlok Ahilyadevi loan waiver
Kolhapur Gokul Milk Union Election
Marathi News Esakal
www.esakal.com