Kolhapur Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमुक्तीचा दुसरा टप्पा सुरू! 37.65 कोटींचा निधी मंजूर, खात्यावर कधी जमा होणार पैसे?

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme : कोल्हापूर जिल्ह्यातील ५ हजार ७८५ शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात ३७ कोटी ६५ लाख रुपयांहून अधिक निधी मंजूर झाला असून रक्कम कर्ज खात्यावर जमा होणार आहे.
Kolhapur farmer loan waiver second phase

Kolhapur farmer loan waiver second phase

esakal

Updated on

कुडित्रे (जि. कोल्हापूर) : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मिळाली आहे. यामध्ये ५ हजार ७८५ लाभार्थ्यांसाठी ३७ कोटी ६५ लाख १५ हजार ४६१ रुपयांचा निधी मंजूर झाला. मंगळवारी ते बुधवारी कर्जमुक्तीचे पैसे कर्ज खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सूत्रांनी (Maharashtra farmer loan waiver 2026) दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com