Kolhapur Rain - राधानगरी धरण क्षेत्रात पावसाची उसंत

धरणात येणारी पाण्याची आवक आणि बाहेर सोडलेले 1400 क्युसेक पाणी तितकेच आहे.
Kolhapur Rain - राधानगरी धरण क्षेत्रात पावसाची उसंत

राधानगरी : चार दिवसाच्या तुलनेत आज सकाळपासून पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतली आहे. यामुळे भोगावतीला (bhogavati river) आलेला महापूर हळूहळू ओसरू लागला आहे. भितीदायक परिस्थिती आज निवळल्यासारखी वाटत आहे. राधानगरी धरणाची (radhanagari dam) पाणी पातळी स्थिर असून अर्धा टीएमसी म्हणजे अडीच फूट पाणी पातळी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्याप बाकी आहे. (kolhapur rain update) आज पावसाचा जोर कमी असल्याने किमान आज धरण भरण्याची शक्यता नाही. सकाळपर्यंतच्या 24 तासात राधानगरी धरण क्षेत्रात 159 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरण 93 टक्के म्हणजे 7. 81 टीएमसी इतके भरले आहे.

Kolhapur Rain - राधानगरी धरण क्षेत्रात पावसाची उसंत
दरड कोसळली; आंबा घाट वाहतूकीसाठी बंद

धरणात येणारी पाण्याची आवक आणि बाहेर सोडलेले 1400 क्युसेक पाणी तितकेच आहे. तुळशी धरण क्षेत्राला चार दिवसात अक्षरशः झोडपून काढले होते. विक्रमी पाऊस नोंदला होता. परिसरात अधून-मधून पावसाच्या सरी सुरु आहेत. काळम्मावाडी धरण (kalmmavadi dam) परिसरातही उघडझाप सुरू आहे. चार दिवसाच्या तुलनेत आजचा पाऊस म्हणजे विश्रांतीच असल्याचा प्रकार आहे. मात्र राधानगरी धरण परिसरात अचानक पाऊस वाढल्यास धरण भरून ओसांडू शकते. राधानगरी धरणाची दुपारी दोन वाजताची पाणी पातळी ३४५.२० फूट आहे. धरण ३४७. ५० फुटाला पूर्ण भरते व स्वयंचलीत दरवाजे खुले होतात. अजून २.३० फुटाने कमी आहे व पाऊस कमी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com